• Email   :   Info@gbsngo.org
  • Phone   :   0253 251 3376

Latest News

26 January 2019
जीबीएस एनजीओच्या माध्यमातून गोदा स्वच्छता अभियानास जोरदार प्रतिसाद

जीबीएस एनजीओच्या माध्यमातून गोदा स्वच्छता अभियानास जोरदार प्रतिसाद...
जीबीएस अर्थात गोसावी बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून गोदा स्वच्छता अभियानास दि. २५/१/२०१९ रोजी दुपारी ३:०० वाजता रामकुंड येथून सुरुवात करण्यात आली. हे अभियान प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी राबविण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदीचा उगम असल्याकारणाने देशभरातून अनेक वैदिक विधींकरिता तसेच पर्यटक व भाविक गोदामातेच्या दर्शनाकरिता नाशिकमध्ये दाखल होतात. परंतु गोदापात्र अस्वच्छतेमुळे पर्यटकांची नाराजी होते व पर्यटन व्यवसायाला पाहिजे तशी साथ मिळत नाही आणि म्हणून या अभियानातंर्गत गोदामातेचे पवित्र राखत नाशिकच्या कला व संस्कृतीच्या तसेच सामाजिक उद्देश्यांच्या उद्धिष्टपूर्तीकरिता संस्थेने हे अभियान अविरत वर्षानुवर्षे पुढे चालत राहावे याकरिता नाशिक नगरीत एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे आणि या ऐतिहासिक कामगिरीचे आपण सर्वजण साक्षीदार होऊन या गोदा स्वच्छता अभियानात मोठ्या संख्येने भाग घ्यावा अशी विनंती आम्ही सर्व संस्थेचे पदाधिकारी व स्वयंसेवक नाशिकरांना व गोदाप्रेमींना करतो. या कार्यक्रमप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सुनीता गोसावी, सचिव विनोद गोसावी, स्वयंसेवक तुशार धुमाळ, श्रुती भुजबळ, भूषण चौधरी, संजीव गिरी, सतीश गुरगुडे, ज्ञानदीप पाटील, विशाल माळी, देविदास गिरी, सागर कराड, किरण महाजन, अनिल भोसले, दत्त वाघ, असिफ शेख, अनिल बागड, संगीत वाघ, सीमा मान, राकेश खरात, भास्कर सोनावणे, प्रवीण पवार, महेश चांद्रमोरे, मृणाली बोरसे समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी शुभम पगारे,स्नेहल सोनावणे यांनी अथक परिश्रम घेतले.

28 December 2018
जीबीएस संस्थेच्या वतीने कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय मुंडे गाव ता. इगतपुरी येथे गरीब , गरजू व अनाथ मुलींना नवीन कपड्याचे वाटप करण्यात आले.

जीबीएस अर्थात गोसावी बहुउदेशीय संस्थेच्या वतीने कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय मुंडे गाव ता. इगतपुरी येथे गरीब , गरजू व अनाथ मुलींना गारमेंट कंपनीच्या सहकार्याने नवीन कपड्याचे वाटप करण्यात आले. त्या ठिकाणी जय जीबीएस च्या घोषणा देण्यात आल्या , त्यामुळे सबंध वातावरण जीबीएसच्या जयघोषाने दणाणून निघाले. या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे सचिव विनोद गोसावी, स्वयंसेवक अविनाश जाधव, देविदास गिरी, भास्कर सोनवणे, निलेश धुमाळ, वनिता जावळे उपस्थित होते.

28 December 2018
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गांडोळे, ता. दिंडोरी, जि. नाशिक या शाळेच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त निमंत्रित करून जीबीएस एनजिओच्या सामाजिक कार्याबद्दल संस्थेला गौरविण्यात आले.

जीबीएस अर्थात गोसावी बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी व स्वयंसेवक यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गांडोळे, ता. दिंडोरी, जि. नाशिक या शाळेच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त निमंत्रित करून जीबीएस एनजिओच्या सामाजिक कार्याबद्दल संस्थेला गौरविण्यात आले. जीबीएस एनजीओने हाती घेतलेले गरीब, गरजू, अनाथ अतिदुर्बल घटकातील मुलांच्याकरिता १००० मुलांचे वसतिगृहाचे निर्मितीची संकल्पना उपस्थित विद्यमान आमदार श्री नरहरी झिरवाळ साहेब यांच्यासमोर मांडण्यात आली. त्यांनी या संकल्पनेस पाठींबा देऊन जनसहयोगाला आपण सर्वांच्या शक्तीनिशी पुढे घेऊन जावू असा शब्दही दिला व जीबीएस एनजीओ चे असेच सामाजिक कार्य पुढे अविरत सुरू राहावे याकरिता शुभेच्छा दिल्या.